भारतीय जनता पार्टी पक्षाचा दिला शंकर चहांदे हयानी राजीनामा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- समटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने माझ्या नावाचा विचार करणे अभिप्रेत होते परंतु माझ्या नावाचा विचार करण्यात येत नसल्याने शंकर चंहादे हयानी भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्राथमिक सदस्य व सर्किय पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.

शंकर चिंतामन चहांदे रा. कन्हान तालुका पारशिवनी, जिल्हा नागपुर सन १९९२ पासुन भारतीय जनता पार्टी पक्षा मध्ये कार्यरत असुन ज्या वेळी अनु सूचित जाती कडुन कोणही व्यक्ति निवडणुक लढण्यास तयार नव्हते तेव्हा सन १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणुक लढविण्यात आली. तेव्हा पासुन आजतागायत भारतीय जनता पार्टी ने वेळो वेळी जी जी आदेशान्वये जबाबदारी दिली ती पक्षाशी एकनिष्ट राहुन प्रामाणिक पणे माझा कोणताही स्वार्थ न ठेवता पार पाडली.

मी भुषवलेली पदे १) १९९२ मध्ये जि प सदस्य पदाची निवडणुक लढविली. २) १९९४- २००७ अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष नागपुर जिल्हा, ३) १९९७ – २००२ सदस्य जि प नागपुर, ४) १९९८-९९ समाज कल्याण सभापती जि प नागपुर ५) २००२ – २००७ सदस्य जि प नागपुर, ६) २००७ -२०१३ भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय परिषद सदस्य, ७) २०१५ – २०२० सदस्य नगरपरिषद कन्हान-पिपरी, ८) २०१७- २०२० नगराध्यक्ष नगरपरिषद कन्हान-पिप री, ९) २०२० ते आज पर्यंत नामर्निदेशीत सदस्य नगर परिषद कन्हान या मागील ३२ वर्षा पासुन भारतीय जनता पक्षा मध्ये कार्यरत असतांना प्रमुख पदाकरिता माझ्या नावाचा पक्षाने विचार करायला पाहीजे होता. तेव्हा तेव्हा मला डावलण्यात आले असुन माझ्यावर अन्याय झालेला आहे.

तसेच समटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने नावा चा विचार करणे अभिप्रेत होते परंतु माझ्या नावाचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य व सर्किय पक्षाचा राजीनामा भाजपा नागपुर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचे कडे पाठविलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरचा सर्वांगीण विकास हेच ध्येय! - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sun Mar 24 , 2024
– रेशीमबाग येथील स्नेहमिलन कार्यक्रमात सहभाग नागपूर :- नागपुरात आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची कामे केली. नागपूर कात टाकत आहे. पण मी एवढ्यावर समाधानी नाही. नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तेच माझे ध्येय आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com