संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ओबीसी महासंघातर्फे नुकतेच खरबी येथील गुरुदेव संस्कार भवन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आणि ओबीसी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाहीर ,सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र भीमराव बावनकुळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे,जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष गुनेश्वर आरीकर, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुशमा भट, नागपुर शहर महिला अध्यक्ष वृंदा ठाकरे, नागपुर शहर अध्यक्ष प्रो राजेश जी राहाटे, नागपुर शहर महिला कार्याध्यक्ष अंजुषा बोधनकर यांच्या हस्ते देण्यात आले, प्रमुख अतिथी ज्येष्ठ वकिल फिरदोस मीरझा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की ओबीसी समाजाने आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्रित यावे असे मत वकील मिरझा यांनी व्यक्त केले, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी सांगितले की देशातील साडेतीन हजार जाती एकत्र कशा येतील यासाठी ओबीसी कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ओबीसी महासंघ काम करीत आहे तेव्हा सर्व ओबीसी समाजानी एकत्र येऊन महासंघाची ताकत वाढवावी असे डॉ बबनराव तायवाडे म्हणाले,यावेळी प्रवीण राऊत,डॉ शरयू तायवाडे,डॉ ए जी राऊत,देविदास बंड, भैय्याजी रडके यांना जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा, शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित विनायकराव इगळे गुरुजी, संगीत नरड, विजय सराड, सुनील बंड, गजानन भोयर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.