अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण विभाग आणि भारतीय शिक्षण मंडळ, नानीबाई शिक्षण महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात शहीद दिन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाणीबाई शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गाडे, प्रमुख अतिथी म्हणून विभागप्रमुख डॉ. गजानन गुल्हाने होते.
डॉ. गुल्हाने यांनी शहीदांचे बलिदान, त्यांचा संघर्ष विविध प्रसंगातून सांगितला. स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक म्हणून आपली भूमिका कशी असली पाहिजे याविषयी विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी जीवन मडावी, अंकिता कांबळे, प्रियांका लहाबर, सानिया पटेल यांनीही यावेळी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश गाडे यांनी शहीद भगतसिंग सुखदेव, राजगुरू, याच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव याच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनश्याम वाघमारे, संचालन अर्चना इंगोले, तर आभारप्रदर्शन दिपाली गवई हिने मानले. कार्यक्रमाला डॉ. शितल विधाते, प्रा. धनश्याम वाघमारे, प्रा. मंजुषा जयसिंगपुरे, प्रा. शुभांगी बोरेकर, नाणीबाई शिक्षण महाविद्यालयातील प्रा. सुप्रिया भुयार, प्रा. धनश्री वानखेडे, प्रा. प्रतीक राठोड, प्रा प्रियांका भटकर तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.