संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट जेनेली स्कुल येथील 9 व्या वर्गातील विद्यार्थिनी शगुण आशिष मेश्राम हिचा द्वितीय क्रमांक आला.या यशाबद्दल शगुण मेश्राम यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
कामठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने सेंट जोशेफ स्कुल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील 90 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून आपल्या वैज्ञानिक अविष्कार च्या कलाकृतीचे सादरिकरण केले .ज्यामध्ये आजनी येथील सेंट जेनेली कॉन्व्हेट ची विद्यार्थिनी शगुण मेश्रामचा द्वितीय क्रमांक आला.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशाताई चनकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे,विस्तार अधिकारी सुनील बालपांडे,मुख्याध्यापक सिस्टर कलाडीया, आशिष यादव, अरविंद सपाटे,वैभव चिमनकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा राठोड,सुचिता आचलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी सुनील बालपांडे यांनी केले.