संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने मतदार चक्रावले
-कामठी नगर परिषद कडे तक्रारींचा पाऊस
कामठी ता प्र 28 :-आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद च्या पाश्वरभूमीवर लागू असलेल्या निवडणूक कार्यक्रमातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा सावळा गोंधळ झाला असून या सावळा गोंधळात शहरातील मतदारासह माजी नगरसेवकगणसह भावी नगरसेवकगण चक्रावले आहेत.त्यामुळे आक्षेप नोंदविण्याच्या अखेरच्या 27 जून या तारखेपर्यंत कामठी नगर परिषद प्रशासनाकडे शहरातील विविध प्रभागातील एकूण 122 आक्षेप नोंदविण्यात आले असून काल आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी 40 आक्षेपकर्त्यांनी आक्षेप नोंदविला.
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने प्रभाग रचना,आरक्षण सोडत,प्रारूप , अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे.कामठी नगर परिषद प्रशासनाने ही शहरातील एकूण 17 प्रभागात केलेल्या प्रभाग रचनेच्या व्याप्तीनुसार विधानसभेच्या यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांची फोड करून 21 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या.प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मात्र फार मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील कित्येक प्रभागातील शेकडो मतदारांची नावे प्रभाग रचनेची व्याप्ती सोडून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहे.21 जून ते 27 जून रोजी पर्यंत आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या अंतिम तारखेपर्यंत बहुतेक प्रभागातून एकूण 122 जणांच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदविला.प्राप्त आक्षेपावर 28 ते 30 जून दरम्यान निवडणूक निर्वाचन अधिकारी हे निर्णय घेणार असून 1 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवार 27 जून आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी कामठी नगर परिषद मध्ये जणू काही आक्षेपकर्त्यांची जत्राच भरली होती.अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.त्यातच या 122 आक्षेपांची स्थळ पाहणी, चौकशी करून निर्णय घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर आक्षेपावर आक्षेपधारकांचे समाधान न झाल्यास अनेक जण न्यायालयात दाद मागणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढणार हे इथं विशेष!
कामठी नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com