“शाब्बास… दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात…!”

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन

 –महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वजाचा सर्वोच्च सन्मान

 मुंबईदि. 28 : – ‘…महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत…शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

          राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहेत्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र  संचालनालयाचे अभिनंदन केले आहे.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमूला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

            महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

          पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बँनर)चा वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधवसर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरीकॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने

Fri Jan 28 , 2022
– कृतीशील लेखक व संवेदनशील कार्यकर्ता हरपला– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील लेखक व संवेदनशील कार्यकर्ता हरपला, अशा शोकभावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त करुन डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.              डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाल्याचे कळल्यावर अतीव दुःख झाले. त्यांचा आणि माझा जवळ जवळ पाच दशकांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com