सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराचा समारोप सोहळा थाटात संपन्न

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 27 – कामठी शहरातील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराचा समारोप घोरपड येथे रविवार दिनांक २७ मार्च रोजी करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र बागडे अध्यक्ष स्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून घोरपड गावच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ ताराबाई कडू उपस्थित होत्या. सोबतच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनोद शेंडे, सचिव श्याम ऊंचेकर, ग्रामपंचायत सदस्य गीता पांडे आणि  खांडेकर सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यारपण केले, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सानेगुरुजी यांनी लिहिलेले सर्वधर्म समभाव दर्शविणारे गीत सादर केले. विद्यार्थ्यांमधून आदित्य गजभिये आणि अंजली पनिकर यांनी तर गावकऱ्याकडून  खांडेकर आणि  मंध्रीमुंदे यांनी सात दिवसिय शिबिरावर आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच सौ ताराबाई कडू यांनी आपल्या भाषणात शिबिरार्थ्यांचे त्यांच्या कार्यकरिता कौतुक करत पुन्हा या गावात शिबिर लावावा असे प्रती पदित केले. या सात दिवसात शिबिरात जे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले गेले त्यात गावकऱ्यांनी, जिल्हा परिषद शाळा घोरपड च्या विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामपंचायत घोरपडचा कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. सरपंच सौ कडू आणि प्राचार्य बागडे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. तसेच प्रसंगी ग्रामपंचायत घोरपड तर्फे सर्व शिबिरार्थ्याना वही व पेन भेट म्हणून देण्यात आले. आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्राचार्य डॉक्टर महेंद्र बागडे यांनी शिबिराला उपस्थित विद्यार्थ्यांना या सात दिवसात आत्मसात केलेल्या मूल्यांचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचे आवाहन केले तसेच गावकरी व ग्रामपंचायात घोरपड च्या समस्त पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या सहकार्याबददल आभार मानले. कार्यक्रमाला डॉक्टर निशिता अंबाडे, डॉक्टर दिपक भवसागर, प्राध्यापक राजेश पराते, डॉक्टर मंजिरी नगमोते, डॉक्टर महेश जोगी, श्याम उंचेकर, कुणाल कडू सह गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेडी ऑफिसर डॉक्टर रागिनी चहांडे यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनोद शेंडे यांनी आभार प्रदर्शनात प्राचार्य डॉक्टर बागडे, उपप्राचार्य डॉक्टर रेणू तिवारी, उपप्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण, रजिस्ट्रार स्वप्निल राठोड, सरपंच सौ ताराबाई कडू, सचिव  श्याम उनचेकर, समस्त घोरपड ग्रामस्थ, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिबिराला उपस्थीत समस्त विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गायत्री महायज्ञ कार्यक्रमात बी. के. सी. पी. शाळा, कन्हानचे उत्कृष्ट प्रदर्शन

Sun Mar 27 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 27 – स्वास्थ्य संवर्धन हेतू शांतीकुंज हरिद्वार गायत्री परिवार तर्फे आयोजित 108 कुण्डीय गायत्री महायज्ञाचे आयोजन रामलक्ष्मी नगर, कामठी येथे दि. 20 मार्च ते 24 मार्चच्या दरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कन्हान, कामठी येथील विविध शाळेद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. ह्यात बी. के. सी. पी. प्रायमरी तर्फे कृष्णजीवनावर आधारित नृत्यनाटिका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com