अंगणवाडी सेविका यांचे HIV/ एड्स विषयी संवेदिकरण कार्यशाळा संपन्न

गडचिरोली :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी बाल विकास प्रकल्प कार्यालय, त. अहेरी येथे अंगणवाडी सेविका यांचे HIV/ एड्स या विषयवार संवेदिकरण कार्यशाळा घेण्यात आली होती.

प्रमुख उद्देश म्हणजे अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण / संवेदिकरण अत्यंत महत्वाचे आहे कारण ते आरोग्य आणि विशेषतः माता आणि बाल आरोग्याशी निगडीत समुदायाशी जवळचा दुवा आहे. तळागळातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करण्याचे आपले प्रयत्न गरोधर मातांमध्ये HIV चाचणी सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. गरोघर माता HIV संक्रमित आढल्यास EVTHS कार्यक्रमाशी त्वरित जोडल्या जाऊ शकतात. आईकडून बाळाला होणाऱ्या HIV/एड्स संक्रमणाचे निर्मुलन उपक्रम, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्याच्या आत गर्भवती महिलेची HIV तपासणी करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेमध्ये HIV/एड्स बद्दल माहिती, HIV प्रसाराचे मार्ग, HIV बाबत समज / गैरसमज, कलंक व भेदभाव मिटविणे, HIV चे प्रतिबंधात्मक उपाय, HIV बाबत उपलब्ध सोयी सुविधा (ART CENTER), HIV / एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम २०१७. तसेच लैंगिक आजार या बाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. आणि जनजागृतीपर। EC साहित्य देण्यात आले. या कार्यशाळेला अहेरी तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा गटविकास अधिकारी राहुल वरठे, हेमा कन्नाके (पर्यवेक्षिका), जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय गडचिरोली जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, डॉ. अभिषेक गव्हारे (CSO), रश्मी मारगमवार (ICTC समुपदेशक), वेंकटेश दिकोडा (Lab. Tech) आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

Sat Aug 31 , 2024
गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली व विविध खेळाच्या एकविध क्रीडा संघटना, शाळा / महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगष्ट, 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद याचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यामध्ये क्रीडा व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com