वरिष्ठ नागरिकांचा उदयनगर गार्डन हास्य व योगा क्लब तर्फे सत्कार

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्य उदयनगर गार्डन हास्य योगा क्लब नागपूर तर्फे पंजाबराव उमक यांचे अध्यक्षतेखाली हास्य क्लबच्या वरिष्ठ सदस्ययांनी त्यांचे पंच्याहत्तर व त्यांच्यापेक्षा जास्त वय असलेल्या अशा सर्व जेष्ठ सभासद व नागरिक यांचे सत्कार करण्यात आले. त्यांचे अनुभव आणि मनोगत या कार्यक्रमात मांडण्यात आले. उदयनगर गार्डन हास्य व योगा क्लबच्या माध्यमातुन त्यांना नविन स्फुर्ती आरोग्य या विषयी प्रसन्न वातावरणमध्ये हासत खेळत जगायची प्रेरणा मिळते. अनेक प्रसंग आणि मतांची मांडणी केली. आयोजकांचे सर्व नागरीकांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला उत्फुतपणे सभासदांनी आपला सहयोग दिला. सर्वश्री भिमराव बेले, डॉ.नरहरी खूणे, डॉ.वसंत डबरे, जर्नादन भाजीपाले, गजानन चावरे, शंकरराव कोरमकर, देवीदास अरमरकर, बाबूराव निमजे, भाऊसाहेब धानुस्कर, रामचंद्र केवटे, बबनराव काकडे, गणपतराव आकरे, माणीकराव झाडे, विजय चांदूरवार, तुळशीराम धोटे, गंगाधर नारनवरे व वसंत रूठे इत्यादींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोहन निंबाळकर यांनी केले तर सचिव मधुकर भोयर यांनी आभार मानले. सर्व सदस्यांना अल्पोपहार व चहा देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. दिलीपकुमार पंचबुध्दे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषेश परिश्रम घेतलेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा - जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Mon Jan 30 , 2023
· 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान भंडारा : कुष्ठरोग उपचारांनंतर पूर्णपणे बरा होतो त्यामूळे या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्हयात 512 कुष्ठरुग्ण आढळले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 515 इतकी झाली आहे. कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्श […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com