मध्य नागपूरात काँग्रेसकडून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार संपन्न

नागपूर :- मध्य नागपूरातील नागरिकांनी संविधानाच्या अधिकार व हक्कासाठी समाजात जागृती करून समाजसेवेचे कार्य केले, त्या ज्येष्ठ नागरिकांचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्कार कार्यक्रम गोळीबार चौकाजवळच्या हलबा सांस्कृतिक भवन,बागल आखाडा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज यांच्या छायाचित्रास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माल्यपर्ण करून अभिवादन केले,त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला.

या ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रदेश सरचिटणीस अँड. नंदा चंद्रभान पराते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कृष्णा गोटाफोडे,पिंटू बागडी, अनिल आदमने, ओमप्रकाश पाठराबे, जयंत दळवी, नामदेव महाल्ले ,वासुदेव वाकोडीकर,उमराव खरबीकर,राधा पाठराबे, सुकेश निमजे, हाजी नसीम अनवर , माधव खापरे, ओमप्रकाश शाहीर, भास्कर चिंचघरे, महादेव खापेकर, मधुकर निखारे मंचावर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून काँग्रेसच्या नेत्या ॲड. नंदा पराते म्हणाल्या की काँग्रेस पक्ष सत्तेवर असतांना लोकशाही मार्गाने जेष्ठ नागरिकांनी जेव्ह- जेव्हा सामाजिक न्याय व हक्कासाठी आपला आवाज बुलंद केला तेव्ह- तेव्हा काँग्रेसने त्यांना साथ दिली, त्यामुळेच देशाची प्रगती व विकास झाला परंतू आज भाजप हुकूमशाहीतून सत्ता चालवित आहे, त्यांचा विरोधात बोलणाऱ्यांचे आवाज बंद केले जाते. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी या देशाच्या संविधान रक्षणासाठी व आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी समाजात जागृती केली पाहीजे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर बांधेकर,शेखर बावणे, नितेश धार्मिक,स्वरित वासनिक,शकुंतला वट्टीघरे, माया धार्मिक, मंजू पराते, मंदा शेंडे यांनी अथक परिश्रम केले तर प्रदेश काँग्रेसच्या वतीने झालेल्या सत्कार कार्यक्रमाचे संचालन जयश्री धार्मिक,कोमल वासनिक तर आभार प्रदर्शन प्रशांत बुरडे यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून असल्याचा अभिमान - अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Sat Aug 3 , 2024
– सर्वाना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका – शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातून प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याचा जिल्ह्यावासियांना अभिमान आहे. या योजनेसह राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. जिल्हा नियोजन सभागृह येथे मुख्यमंत्री युवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com