संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवरावजी भोयर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ मे २०२३ ला सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरातील स्व. यादवरावजी भोयर मेमोरियल हॉल येथे अभिवादन करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेश भोयर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, अनुराग भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्व. यादवरावजी भोयर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश भोयर तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी भोयर यांनी केलेल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या बहुमूल्य कार्याची आठवण करून आपले मनोगत व्यक्त केले.
मागच्या वर्षी पासून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांकरीता स्व. यादवरावजी भोयर शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली असून यावर्षी चा शिष्यवृत्ती पुरस्कार बी.फार्म. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी श्रुती सजन चिमणकर तसेच तन्मय अमित बॅनर्जी या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु १० हजार तसेच प्रमाणपत्र संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, प्राचार्या डॉ रूपाली पाटील, प्राचार्या डॉ ईशा मुदलियार, प्राचार्य डॉ दिलीप कोहळे, डॉ अतुल हेमके तसेच संस्थेतंर्गत महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ प्राध्यापक गण, शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नेहा राऊत यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने करण्यात आला.