नागपूर :- हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे येत्या 28 ते 31 मार्च 2024 दरम्यान आयोजित 45 व्या अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळ स्पर्धा- 2024 करीता महावितरण संघाच्या निवड चाचणीचे आयोजन शुक्रवारपासून (दि. 22 मार्च) महावितरणच्या कला व क्रीड़ा क्लब, गद्दीगोदाम, नागपूर येथे करण्यात आले.
या निवड चाचण्यांमधून या स्पर्धेकरिता महावितरणचे बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस टेनिक्वाईट आणि बॅडमिंटन या खेळात सहभागी होणा-या महिला व पुरुष संघातील अंतिम खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कंपनीचे एकूण 62 खेळाडूंचा सहभागी झाले आहेत. या विवड चाचणीतील सामन्यांचे उद्घाटन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर मंडलाचे अधीक्सक अभियंता अमित परांजपे, उपमहाव्यवस्थापख (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रतिक्षा शंभरकर आणि अनेक अधिकारी, कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.
फ़ोटो ओळ – 45 व्या अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळ स्पर्धा- 2024 करीता आयोजीत निवड चाचण्यांचे उद्घाटन टेबल टेनिस खेळून करतांना मुख्य अभियंता दिलीप दोडके