अमरावती :- अहिल्या विद्यापीठ, इंदौर येथे दि.04 ते 08 नोव्हेंबर, 2023 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चमूची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंचा प्रशिक्षणवर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 25 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेला आहे.
खेळाडूंमध्ये श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाडचा आकाश चव्हाण, कुणाल गायकवाड व आदित्य वाणी, संत गाडगे महाराज महाविद्यालय, वलगावचा आदेश वानखडे, अजय तायडे व अंकुश कडू, महात्मा फुले महाविद्यालय, पातूरचा सिध्देश्र्वार गवळी व सुनिल गोटे, इंदिरा महाविद्यालय, कळंबचा दत्ता वाघमोडे, कला व वाणिज्य महाविद्यालय,वारवट बाकलचा रोशन आमले, एम.ई.एस. महाविद्यालय, मेहकरचा करण अंभोरे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा आकाश ढाकरे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा रुपेश कासदेकर व सोमेश अजबले, श्री धाबेकर महाविद्यालय, खडकी अकोलाचा प्रफुल्ल खोपे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा करण बुंदेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीचा सौरभ मरसकोल्हे यांचा समावेश आहे. चमू व्यवस्थापक म्हणून अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचे डॉ. किशोर तायडे, संघाचे कोच म्हणून युवाशक्ती महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. आकाश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.