अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील कलावंत विद्यार्थ्यांची सत्र 2023 -24 करीता राष्ट्रीय आंतर विद्यापीठ कव्वाली स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या चमूमध्ये श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय,पुसदची कु. सिध्दी सोनटक्के, लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळची दिव्या शेंडे, श्री विट्ठल रुख्मिणी कला वाणिज्य महाविद्यालय,सवनाची प्रांजली देशमुख, महिला महाविद्यालय, अमरावतीची कोमल ढोके, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा ऋतिक भोरे व अमर कतोरे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा क्रिश आत्राम व रोशन अवसरमोल, जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय,दर्यापूरचा सुमित वाहिले, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा आदर्श नंदवंशी, तर राखीव म्हणून प्रो. राम मेघे इन्स्टि. ऑफ टेक्नॉ. अॅन्ड रिसर्च, बडनेराचा आदित्य अघडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची श्रेया वटक, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची मृदुल कुचनकर, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा गजानन पळसकर यांचा समावेश आहे. साथिदार म्हणून परतवाडा येथील कार्तिक नंदवंशी व हितेश व्यास, राखीव म्हणून अमरावतीचे श्री विशाल पांडे, चमू व्यवस्थापक म्हणून श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय, यवतमाळचे डॉ. निखिलेश नलोडे व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या डॉ. वैशाली देशमुख यांचा समावेश आहे. निवडीबद्दल चमूंचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.