अमरावती :- छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 05 ते 09 नोव्हेंबर, 2023 दरम्यान होणा-या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य-2023 स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवामधील कलावंत, स्पर्धक, साथिदार चमूंची ए.आय.यू. नवी दिल्ली यांचे पात्रता नियमानुसार युवा महोत्सव चमूमध्ये तात्पुरती निवड करण्यात आली आहे. ही चमू 04 नोव्हेंबर रोजी स्पर्धेत सहभागी होण्याकरीता अमरावती येथून रवाना होईल.
चमू प्रशिक्षण कालावधी
महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य -2022 स्पर्धेकरीता चमूंचा प्रशिक्षणवर्ग 21 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत विद्यापीठातील स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन येथे होणार आहे. निवड झालेल्या सर्व चमूंनी नियोजित दिनांकास उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे.
निवड झालेल्या कलावंत, स्पर्धक, साथीदार यांची नावे
फाईन आर्टकरीता श्री शिवाजी विज्ञान महा., ची रुद्राणी बारब्दे, ब्राजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावतीची प्रगती सुधा (राखीव), कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायो इंजि. अँड रिसर्च सेंटर अमरावतीचा आदित्य वरणकर, वादविवाद स्पर्धेकरीता श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची आरिफा शब्बीर हुसैन, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची सायली इंगळे (राखीव) व इन्स्टिटूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च बडनेराची नफिसा शब्बीर हुसैन, वक्तृत्व स्पर्धेकरीता सिपना कॉलेज ऑप इंजि. अॅन्ड टेक्नॉ. अमरावतीची श्रेयासिंह ठाकूर, श्री शिवाजी विज्ञान महा., अमरावतीची वेदिका शिरभाते (राखीव), प्रश्नमंजुषा स्पर्धेकरीता विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा व्योम देशपांडे व उमेश तांबटकर आणि सौरभ वानखडे, वेस्टर्न सोलो स्पर्धेकरीता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची दिव्या बसोले, शास्त्रीय गायन स्पर्धेकरीता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा अशोकसिंह भाटी, सुगम संगीत स्पर्धेकरीता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा मोहंमद अब्सार साबीर, शास्त्रीय वाद्य संगीत/तालवाद्य स्पर्धेकरीता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोटचा अजिंक्य महाले, तर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा प्रथमेश मोरे (राखीव), स्वरवाद्य स्पर्धेकरीता स्व. लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय, तिवसाचा अनुराघ बाभुळकर व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा आकाश वानखडे (राखीव), समूहगान (भारतीय) स्पर्धेकरीता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा शिवम शर्मा, महिला महाविद्यालय, अमरावतीची निकिता मोने व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची रक्षिता मेश्राम, तर राखीव म्हणून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा क्रिश आत्राम, महिला महाविद्यालय, अमरावतीची कोमल ढोके, शास्त्रीय नृत्य स्पर्धेकरीता डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीची वैदेही काकडे, राखीव म्हणून प्रो. राम मेघे इन्स्टि. अॅन्ड रिसर्च, बडनेराची स्वरा राऊत, समूहनृत्य स्पर्धेकरीता विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा शंतनू ठाकरे, गुरुदास कतोरे व मौसमी राठोड, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा प्रतिक तरले, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा प्रज्वल भुजाडे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा धीरज वानखडे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,अमरावतीची कादंबरी जंभाडे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची आस्था जोंधळेकर आणि प्रो. राम मेघे इन्स्टि. ऑफ टेक्नॉ. अॅन्ड रिसर्च बडनेराची सिध्दी काळे, राखीव म्हणून सिपना स्कूल ऑफ प्लानिंग अॅन्ड आर्किटेक्चर, अमरावतीची योगिता गावंडे व श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखलीचा मयूर अंभोरे, पाश्चिमात्य समूहगान स्पर्धेकरीता प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजि. अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेराची आर्या देशमुख, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची बनरोई भशिषा व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची अनुष्का ठाकरे आणि राखीव म्हणून अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोलाची साक्षी सूर्यवंशी, पाश्चिमात्य वाद्यसंगीत स्पर्धेकरीता श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा ऋषिकेश दुधाळे व राखीव म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा पियुष बनसोडे, फोक ऑर्केस्ट्रॉ/पाश्चिमात्य वाद्य स्पर्धेकरीता ब्राजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावतीचा सर्वेश पाठक,श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय, यवतमाळचा अस्मित अकाले, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची गुंजन भोरे, राखीव म्हणून श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा रितेश जोंधळेकर, एकांकिका/स्किट/माईम/मिमिक्री स्पर्धेकरीता ब्राजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावतीचा मानस एलगुंदे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा प्रियांशू गावंडे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगावची कु. रोशनी बोराळे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीची श्रध्दा पेंडसे व विषू आवंजे, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूरचा ओमप्रकाश गवई, समाजकार्य महाविद्यालय, बडनेराची शिवानी ठाकरे, प्रो. राम मेघे इंन्स्टि. ऑफ टेक्नॉ. अॅन्ड रिसर्च, बडनेराची आर्या वानखडे, हिमांशू इहारे (राखीव) व सिपना स्कुल ऑफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किटेक्चर, अमरावतीची नारायणी काळे, साथीदार म्हणून वाहेदखान शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचे भूषण वानखडे, अमरावतीचे प्रकाश मेश्राम, प्रशांत ठाकरे, अभिजित भावे, राहुल तायडे आणि दिपक नांदगांवकर, राखीव म्हणून अविनाश पाटील, चमू व्यवस्थपक म्हणून भारतीय महाविद्यालय, मोर्शीचे डॉ. सावन देशमुख व एस.आर. मोहता महिला महाविद्यालय, खामगावच्या डॉ. सीमा देशमुख, राखीव म्हणून स्व. छगनलाल मुलजीभाई कढी महाविद्यालय, परतवाडाचे डॉ. प्रसाद मडावी व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाच्या डॉ. नेत्रा मानकर यांचा समावेश आहे.