संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातून एकूण पाच विद्यार्थ्यांची भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकता शिबिरासाठी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय एकता शिबिर भुवनेश्वर येथे होणार असून या शिबिरामध्ये सुग्रता वंजारी महिला महाविद्यालय, वडोदा ता. कामठी जि. नागपूर येथे BSC मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी ऐश्वर्या जगताप हिची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या शिबिरामध्ये ऐश्वर्या जगताप ची निवड नागपूर विद्यापीठामुळे कडून करण्यात आल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये सदर वंजारी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची निवड केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे व त्यांच्या विभागाचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.
ग्रामीण भागामध्ये शिकत असलेली ऐश्वर्या जगताप हीची राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये निवड होणे ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून गौरवास्पद आहे. त्यामुळे ऐश्वर्या जगताप हीचे महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बाबुदास दमाहे, प्रा. ममता घोडे सह इतर सर्व कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले