जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकेश्वर येथील 5 विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड

नागपूर :- शैक्षणिक सत्र 2022- 23 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषद नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकेश्वर येथील वर्ग आठवी मधील 5 विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींची नावे खालील प्रमाणे आहेत

कशीश नरेंद्र चौके, वैष्णवी विष्णू सपाटे, श्रुती उमेश राऊत, सोनाली विजय किनेकार व रोशनी दुर्गेश किरणापुरे.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिका शिंदे  व साखरवाडे भोंडे , टेकाम व तसेच बांगरे  व चवळे यांना दिले.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रंजीत ठाकूर व उपाध्यक्ष  सचिन बर्वे व शिक्षणतज्ञ टिकाराम सपाटे व रवी चवळे, अर्चना सपाटे, देवका तांडेकर तसेच समस्त सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फडणविस साहेब..रामटेक विधानसभा क्षेत्रातील विकासकामांकडे लक्ष द्या - माजी आमदार रेड्डींचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

Sat May 13 , 2023
– अर्धवट कामेही मार्गी लावण्याची केली विनंती रामटेक :- रामटेक विधानसभा क्षेत्राच्या विविध भागातील विविध विकास कामाकडे महा. राज्य शासनाने लक्ष द्यावे तथा ती विकासकामे मार्गी लावावी यासाठी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. उल्लेखनिय म्हणजे यात काही कामे तर काही वर्षांपासुन अर्धवट स्थितीत खितपत पडलेली असुन त्याकडे थोडं जरी लक्ष दिले तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com