संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली : संत सेवालाल महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Wed Feb 15 , 2023
मुंबई :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नीलेश लंके, संजय रायमूलकर, प्रशांत बंब, राजेंद्र यड्रावकर, संजय गायकवाड यांनीही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com