संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिसरात आगामी मकरसंक्रातीला पतंगबाजीला येणारे उधाण अनेकांच्या जीवावर बेतू शकत असल्याने नागपूर शहर पोलीस सरसावले आहेत. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा होणारा सर्रास वापर पाहता पोलीस सज्ज झाले आहेत.नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 च्या वतीने काल कोराडी येथील जुने मच्छि मार्केट परिसरातील दिया आईस्क्रीम पार्लर व जनरल स्टोर वर रात्री साडे आठ दरम्यान पोलिसांनी घातलेल्या धाडीत केलेल्या कारवाईत मोनो काईट, गोल्ड व सुपर क्वालिटी कंपणीचे विविध रंगाची प्रतिबंधित नायलॉन मांजा असलेली 14 हजार 350 रुपये किमतीचे एकूण 34 मांजा चक्री जप्त करण्यात आले.तसेच आरोपी हिरालाल उर्फ बंटी कासवाणी वय 38 वर्षे जरीपटका नागपूर विरुद्ध भादवी कलम 188,सहकलम 5,15 पर्यावरण संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पतंगबाजीत नायलॉन मांजाचा होणारा वापर मानवी जिवितास धोका निर्माण करणारा आहे. याशिवाय पशु-पक्ष्यांच्या जीवाला बेतणारा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदी आणली आहे. नागपूर परिमंडळ क्र 5 च्या पथकाला सदर घटनास्थळी नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्वरित सापळा रचत नायलॉन मांजा विक्री होणाऱ्या दुकानात धाड घालण्यात यश गाठले.व आरोपीसह 34 अवैध नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आले.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्षणार्थ एपीआय ठाकूर सह पथकाने केले आहे .तेव्हा नागरिकांनी पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन डीसीपी निकेतन कदम यांनी केले आहे.