अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी USIEF फेलोशिप उत्तम संधी
USIEF च्या डॉ. दास यांचे विविध NGO प्रतिनिधींना मार्गदर्शन
नागपूर : परदेशात शिक्षण प्राप्त करून त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या देशात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी शिक्षणासाठी पुढे आलेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन’ (USIEF) फेलोशिप ही एक उत्तम संधी आहे. याबद्दल विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना माहिती मिळावी, या उद्देशाने मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मनपा मुख्यल्यातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सभा कक्षात करण्यात आले.
कार्यशाळेत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर, युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे सीनियर प्रोग्राम ऑफीसर डॉ. सुदर्शन दास प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुदर्शन दास यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी एचसीएल फाउंडेशन, एलएफई फाउंडेशन, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन, मासूम फाउंडेशन, मेलीओल फाउंडेशन, उपाय फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन, आरोह फाउंडेशन, स्वच्छ असोसिएशन अँड टू गेदर वी कॅन, अग्रेसर फाउंडेशन, एन्व्हायरमेंट फाउंडेशन, प्रयास फाउंडेशन, जीवन विद्या फाउंडेशन यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, समाजात बदल घडवून आणण्याच्या उद्धेशाने प्रत्येक स्वयंसेवी संस्था कार्य करीत असते. अशात इतर देशांमध्ये सुरू असलेल्या उत्तम कार्यप्रणालीची माहिती घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या फेलोशिप आपल्याला परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत करते. येथे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या देशाच्या विकासासाठी करू शकतो, त्यामुळे मिळालेली संधी न सोडता या संधीचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे सुदर्शन दास यांनी USIEF द्वारे फुलब्राईट – नेहरु आणि डॉ. कलाम यांच्या नावाने दिल्याजाणाऱ्या विविध फेलोशिप बद्दल माहिती देत त्याकरिता अर्ज कस करावा, अर्जात कुठले विशेष मुद्दे नमूद करावे, आदी विषयांची माहिती दिली. सुदर्शन दास यांनी USIEF बद्दल सांगितले की, अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘युनायटेड स्टेट्स- इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन’ द्वारे फेलोशिप दिल्या जाते. फुलब्राइट प्रोग्राम हा आता जगातील सर्वात मोठा शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. जो अमेरिका (यूएस) सह 160 हून अधिक देशांदरम्यान कार्यरत आहे. याद्वारे आजवर २० हजार भारतीयांना फेलोशिप आणि अनुदाने प्रदान करण्यात आले आहे. या फॅलोशिप कार्यक्रमाची माहिती मनपा आणि इतर शाळांच्या शिक्षकांना सुध्दा देण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर सुध्दा उपस्थित होते. ते म्हणाले की, या उदबोधन वर्गामुळे शिक्षकांमध्ये आंतरीक स्फुर्ती जागृत होवून नविन समाजाला घडवतील.