महामहीम राष्ट्रपती यांच्या गडचिरोली दौ-याच्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु

गडचिरोली :- मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचा एक दिवसीय दौरा कार्यक्रम हा निश्चीत झाला असुन दिनांक 05/07/2023 रोजी मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीत आगमन होणार आहे. दिनांक 05/07/2023 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील दिक्षांत समारंभ मध्ये मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार या उपस्थित राहणार आहेत.

मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांना दहशतवादी संघटनाकडुन संभाव्य धोका तसेच Non-Connventional Aerial Objects, Drones remote controlled or remotely piloted aircrafts, aircraft, systems, para-gliders, aero-models parachute कडुन असलेल्या नविनतम धोका लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणुन संपुर्ण गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत “ नो ड्रोन झोन” घोषीत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये Non-Connventional Aerial Objects, Drones remote controlled or remotely piloted aircrafts, aircraft, systems, para-gliders, aero-models parachute उडविण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच सदर हद्दीत 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती ला एकत्रीत होण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

कोणत्याही व्यक्तीने किंवा कार्यक्रमाचे आयोजकांनी संपुर्ण गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आकाशात Non-Connventional Aerial Objects, Drones remote controlled or remotely piloted aircrafts, aircraft, systems, para-gliders, aero-models parachute उडवु नये. त्या कालावधीत जर शासकीय यंत्रणांना मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचे गडचिरोली दौरा कार्यक्रमाचे अनुषंगाने तथा सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन शुटींग ची आवश्यकता असेल आणि त्यांनी तशी परवानगी मागितली तर त्यांना विहीत शर्ती व अटींना अधीन ठेवुन परवानगी देण्यात येईल. सदरचा आदेश दिनांक 04/07/2023 चे 00.01 ते दिनांक 05/07/2023 चे 18.00 वा पर्यत अंमलात राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 कायदयान्वये शिक्षेस पात्र राहील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि. 4 जुलै 2023 एकूण निर्णय- 8

Tue Jul 4 , 2023
कृषि विभाग नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथील कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या केंद्रासाठी २२७ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com