नागपूर :- रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे शास्त्रोक्त विश्लेषण करून उपाययोजना करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याच्या आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.
आयुक्त प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर, येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे व जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघाताचे तपास करण्यासाठी पथक स्थापन करून त्यांना आवश्यक प्रशिक्षणाचे उद्घाटन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
रस्ते अपघातात आलेल्या नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे अपघात कसे कमी होतील याबाबतची उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यासाठी फिल्डवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचे यासंदर्भातील ज्ञान परिपूर्ण असावे तसेच या बाबतीतील अडचणी तातडीने सोडवण्यासाठीची कार्यपद्धत तयार करण्यास या विश्लेषणाचा उपयोग होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर उदृघाटनासाठी परिवहन उप आयुक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, प्रादेशिक अधिकारी नागपूर रविंद्र भुयार, चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, नागपूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक, गोंदियाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, वर्धाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मो. याकुब, उप प्रादेशिक नागपूर हर्षल डाके, हे यावेळी उपस्थित होते.
वाहन अपघाताचे शास्त्रोक्त विश्लेषण कार्यशाळा तथा प्रशिक्षण नागपूर भंडारा, चंद्रपूर , गोंदिया, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना विविध अपघात प्रवण क्षेत्रातील तसेच राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील अपघाताविषयी सविस्तर शास्त्रीय विश्लेषण करून तेथील अपघाताचे प्रमाण कशाप्रकारे कमी करता येईल. या अनुषंगाने वैज्ञानिक अपघात तपासणीचे महत्व प्रांसंगिक घटकांचे पध्दशीर दस्तऐवजीकरण ,क्रॅश डायनॅमिक्स अपघात झालेल्या वाहनाची तपासणी करतांना वाहनाच्या चालकाने सिटबेल्टचा वापर केला होता काय, मोटार सायकल असेल तर वाहन चालकाने हेल्मेट परिधान केले होते काय, अपघात झालेल्या वाहनाचे छायाचित्र घेणे अपघात झालेला व्यक्ती प्रवासी की पादचारी होता. याबाबत अपघाताचे शास्त्रोक्त विश्लेषण करण्याबाबतचे प्रशिक्षण भूवनेश भरत आलवार केपीएमजी यांनी सादरीकरणाव्दारे सर्व अधिकाऱ्यांना दिले.
सदर प्रशिक्षणाकरीता परिवहन विभागाचे 99 अधिकारी तर इतर विभागाचे 57 अधिकारी असे एकूण 156 अधिकारी उपस्थित होते.