अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- गोंदिया येथे एसेंट पब्लिक स्कूल या स्कूल व्हॅनचा अपघात झाला असून ही व्हॅन आज एसेंट पब्लिक स्कूल राणीअंतीबाई चौक इथली असुन ही व्हेन सकाळी १३ मुलांना शाळेत सोडून परत जात असताना हा अपघात झालं आहे. गोंदिया येथील रिंग रोड बायपास च्या फुल उतरताना गाडी ची स्टेरींग लॉक झाल्या मुळे अपघात झाल्याचे गाडी चालक भुमेशवर लांजेवार यांनी सांगितले.
या गाडीमध्ये मुले नसल्याने सुदैवाने वाचले असुन गाड़ी ३० फुटावरून खाली कोसळली आहे. गाडीमध्ये फक्त एकटा चालकच होता. गाडीचालक जखमी झाला आहे.