शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

– मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम

मुंबई :- दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने बुधवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शपथ दिली जाणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमाला बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Wed Nov 8 , 2023
मुंबई :- मौजे – मेढा हनुमाळ माळी शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावातील आणि रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत विविध समस्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत मांडल्या. मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com