संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-आज 27 जून शाळेचा पहिला दिवस साजरा , विद्यार्थ्यांचे ‘स्कुल चले हम’
कामठी ता प्र 27:-गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते त्या पाश्वरभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते त्यानुसार आज 27 जून शाळेचा पहिला दिवस म्हणून कामठी तालुक्यातील प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.तर शालेय सुट्ट्यानंतर आज 27 जून पासून शाळेचा पहिला दिवस म्हणून तालुक्यातील समस्त शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला तर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले.
शाळा सुरू होणार असल्याने बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पालक , विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली होती तर आज 27 जून शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी शाळेत जाण्याच्या उत्साहासह ‘स्कुल चले हम’चा गुंज करीत शाळेत जाण्याच्या उत्साहात दिसून आले.
कामठी तालुक्यात शालेय प्रवेशोत्सव साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com