नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १६ नोव्हेंबर) रोजी पथकाने २८ मंगल कार्यालय, २१ मंदीरे, ९ मस्जिद, ४० शाळा व कॉलेज आणि अन्य ५ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १०३ स्थळांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Pellentesque fermentum massa vel enim feugiat gravida. Phasellus velit risus, euismod a lacus et.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com