31 जानेवारीपर्यंत शाळा बंदच

नागपूर दि.27 : जिल्ह्यामध्ये सतत वाढणारी बाधितांची संख्या लक्षात घेता पुढील 31 जानेवारीपर्यंत ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या संदर्भात रात्री उशिरा माहिती दिली.
महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे सुचविले होते. नागपूर जिल्ह्यात दररोजची रुग्णसंख्या चार हजाराच्या घरात असून टक्केवारी 50 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे सध्याच मुलांना शाळांमध्ये एकत्रित आणणे उचित ठरणार नाही. यासंदर्भात जिल्ह्याच्या कोरोनाविषयक टास्कफोर्सने देखील बाधितांची संख्या बघून निर्णय घेणे योग्य ठरेल असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 31 जानेवारीला यासंदर्भातील आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
*****

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दुर्गम भागातील नागरिकांकरीता महामेळावा संपन्न.

Thu Jan 27 , 2022
-सतीश कुमार , गडचिरोली गडचिरोली – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयात उद्योगधंदयाचा अभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी या हेतुने उद्यास आलेल्या पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा), गडचिरोली, AAIMS Protection Service Pvt. Lmt. Hyderabad, BOI STAR RSETI, Gadchiroli,अॅक्सिस बँक शाखा, गडचिरोली, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com