सावनेर :- अंतर्गत १० कि. मी. अंतरावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ खापा पाटणसावंगी सावनेर येथे दिनांक ०२/१०/२०२३ चे ०९.०० वा. ते ०९.३० वा. दरम्यान सावनेर पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून सावनेर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करून आरोपी क्र. ०१) जितेन्द्र द्वारका प्रसाद मरकाम वय २८ वर्ष हा आपले ताब्यातील बोलेरो पीकअप गाडी क्र. एम. पो-०५ / जी – ७८८१ मध्ये ४ म्हशी तसेच आरोपी क्र. २) अकीत कल्लू मेहदुले वय २३ वर्ष याचे ताब्यातील बोलेरो क्र. पौकअप गाडी एम. एच-३३ / डी-२२३१ वाहनामध्ये ३ म्हशी व हेला असा वाहनामध्ये बेकायदेशिररित्या म्हशी व हेल्याचा पायाला तोंडाला दोरीने बांधुन निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून एकुण म्हशी व हेल्याची प्रत्येकी २००००/- प्रमाणे १,६०,०००/- तसेच वाहनाची किंमत ६००,०००/- रू प्रमाणे असा एकुण ७,२०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस हवालदार बंडु कोकाटे पोस्टे सावनेर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम १९(१) (ड) प्रा. छ. प्रती. का. सहकलम १०९ भादवी कायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीतांना सूचनापत्रावर रिहा करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश झोडापे, पोस्टे सावनेर हे करीत आहे.