संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
बुटीबोरी येथील म्हाडा वसाहतीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
रमाई महिला मंडळाचे आयोजन
नागपूर/०३ जाने:- स्त्री ला पुरुषांप्रमाणे जगता यावे यासाठी त्यांना शिक्षणाची संधी मिळणे गरजेचे आहे.या विचारांची कास धरत समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम माता सावित्रीबाई यांना शिक्षित केले.त्यानंतर स्त्री शिक्षणाची जिम्मेदारी स्वतः घेत सावित्रीबाई यांनी मनुवादी लोकांच्या शेण मातीचा मारा खात पुण्यातील भिडेवाड्यात १ जानेवारी १८४८ ला स्त्रीयांकरिता पहिली शाळा सुरू केली. म्हणूनच तर आज चूल आणि मूल अशी संस्कृती असलेल्या आपल्या देशात स्त्रियानी प्राध्यापक,वैमाणिकासह पंतप्रधान व देशाच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली.याचे सर्व श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते.म्हणूनच स्त्री शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीबाई फुले होत असे प्रतिपादन बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले. बुटीबोरी येथील प्रभाग क्रं ७,म्हाडा वसाहती मध्ये रमाई महिला मंडळ च्या वतीने आज दि ३ जाने ला स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या,आदय शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती चा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक मनोज ढोके,पत्रकार चंदू बोरकर,संदीप बलविर,जनार्धन मुन,प्रेमदास मुन प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून माता सावित्रीला वंदन केले. या कार्यक्रमाचे संचालन धम्मबंधु अरविंद नारायने,प्रास्ताविक संगीता रामटेके,तर आभार सुषमा मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष कांचन दुपटे,ज्योती मुन,अस्मिता गेडाम,रेखा सहारे, शालिनी सहारे,वैशाली उके,सुजाता वानखेडे,अमोलिका पिल्लेवाण,रिता दखणे,श्रुती नाईक,आशा मुन,मीनाक्षी पाटील,नूतन रामटेके, वैशाली कांबळे व उमा कांबळे यांनी परिश्रम घेतले.