सावित्रीबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी

चंद्रपूर :- चंद्रपूर मनपाच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.

उद्घाटकीय भाषणात आमदार किशॊर जोरगेवार यांनी विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात असल्याचे तसेच शाळेच्या शैक्षणिक प्रगतीच्या चढत्या आलेखाबद्दल शिक्षकांची प्रशंसा केली. आयुक्त विपीन पालीवाल यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्रगतीची दखल राष्ट्रीयस्तरावर व राज्यस्तरावर घेत असल्यामुळे शिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच आवश्यक सर्व भौतिक सुविधा मनपा प्रशासनातर्फे पुरविण्याची खात्री दिली जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी विद्यार्थी कान्व्हेंट प्रमाणे संचलन करत असल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आयोजीत महिला पालक स्पर्धा ,पोता गेम ,टायर गेम,संगीत खुर्ची,कबड्डी या विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धंकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेची दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर नर्सरी ते वर्ग १० पर्यंतच्या विद्यार्थांनीआकर्षक व नेत्रदिपक नृत्य व नाटीका सादर केली. या[प्रसंगी आयुक्त विपिन पालिवाल,जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे,कुंदा बावणे,राधा चिंचोलकर तसेच मोठ्या प्रमाणात पालक व नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव : खो-खो, ॲथलेटिक्सला १२ जानेवारीपासून सुरुवात

Wed Jan 8 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी मॅरेथॉन व युवा दौड चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१२ जानेवारी) सकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथून मॅरेथॉन आणि सकाळी ६.३० वाजता युवा दौडला सुरूवात होणार आहे. याशिवाय विदर्भ स्तरीय खो-खो आणि ॲथलेटिक्स स्पर्धेला सुद्धा रविवारी १२ जानेवा रोजी सुरुवात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!