नागपूर :- भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चा तर्फे ,धन्यवाद मोदी अभियान, यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे नागपूर शहर संपर्क मंत्री सारंग गोडबोले यांची शहर संयोजक व ओबीसी मोर्चा नागपूर शहरचे प्रसिध्दी प्रमुख उमाशंकर नामदेव यांची श्हर सहसंयोजक या पदावर नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिका-यांनी भाजपा ओबीसी मोर्चाचे सर्व प्रदेश पदाधिका-यांचे, शहर पदाधिका-यांचे आभार मानले.
त्या प्रत्यर्थ भाजपा ओबीसी र्मोचा नागपूरचे शहर अध्यक्ष रमेश चोपडे व भाजपा ओबीसी र्मोचा नागपूर महानगरचे उपाध्यक्ष ऑड. दादासाहेब वलथरे व इतर पदाधिका-यांची उपस्थितीत नवनियुक्त शहर संयोजक सारंग गोडबोले व उमाशंकर नामदेव यांचे स्वागत अभिनंदन केले.
या प्रसंगी भाजपा ओबीसी र्मोचा नागपूर महानगरचे अध्यक्ष रमेश चोपडे उपाध्यक्ष दादासाहेब वलथरे, तसेच दिलीप मेश्राम मनोज ढोरे, प्रफुल मंडपे, रजत हाडके, संदीप कट्यारमळ, हरीदास कांजरीकर, संजय धुर्वे, रोशनी धुर्वे, अॅड.प्रांजली हुकरे , अश्वनी रंगारी, अॅड. ए.एन. दिघोरे, सुरेश प्रसाद, नागदेव कन्नाके, आदी उपस्थित होते.