सराईत गुन्हेगार पवन नरेश नेवारे याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई

नागपूर :- पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाच्या पिपळा डाक बंगला परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार पवन नरेश नेवारे, वय २३ वर्ष रा. पिपळा डाक बंगला याने पोलीस स्टेशन खापरखेडा परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून गुन्हेगारी मध्ये निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. सदर स त अपराधी हा शरीराविरूध्द व मालमत्तेसंबंधात गुन्हे करण्यात अग्रेसर असल्याने त्यांचे या कृत्यामुळे सामान्य जनतेच्या जिवातास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. अश्या या धोकादायक गुन्हेगाराविरूध्द नागपुर ग्रामीण पोलीसांनी बरेच वेळा प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. तसेच त्यावेविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्हयात त्याला वारंवार अटक सुद्धा करण्यात आली व त्याचे वर्तणुकीत सुधारणा व्हावी या हेतुने त्याला कारागृहात ही पाठविण्यात आले. परंतु कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याचे मध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. याउलट तो अधिक निडर व दुःसाही होत गेला. त्याने साथीदारासह दुखापत पोहचवून शिवीगाळ करून जिवे मारण्याची देणे, साथीदारासह दरोडा, अवैध हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे करत गेला. त्यामुळे परीसरात राहणा-या नागरीकांमध्ये त्याची प्रचंड दहशत निर्माण झाली. यामुळे त्याचेवर नियंत्रण ठेवुन त्याचेवर प्रभावी कारवाई करणेकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी ठाणेदाराला कठोर व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पो स्टें खापरखेडाचे ठाणेदार यांनी सदर गुन्हेगाराविरूध्द एमपीडिए कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांना सादर केला. मा. जिल्हाधिकारी यांनी सदर सहाईत गुन्हेगाराची वृत्ती व त्याने केलेले गुन्हे तसेच त्याने खापरखेडा परीसरात माजविलेली दहशत लक्षात घेता सदर गुन्हेगारा विरूद्ध योग्य ती दखल घेवून त्यास ०१ वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश दिल्याने सहाईत गुन्हेगार पतन नरेश नेवारे यास दिनांक १०/२०/२०२३ रोजी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, हर्ष ए पोद्दार, व अपर पोलीस अधीक्षक, डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सुरज परमार, निलेश बर्वे, होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या इसमांविरूद्ध कारवाई, वाहनासह एकूण १,२२,६०० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Wed Oct 11 , 2023
– पोलीस स्टेशन खापाची कारवाई खापा:- दिनांक ०९/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील स्टॉफ यांनी पोस्टे. परीसरात पेट्रोलींग करीत असता मुखवीरद्वारे खबर मिळाली कि, मौजा खैरी नाला येथे एक छोटा हाती पिकअप मध्ये काही इसम विनापरवाना अवैधरित्या रेती उत्खनन करून चोरी करीत आहे. अशा मिळालेल्या खबरेवरुन पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता मौजा खैरी नाला येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!