कामठी तेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष कृ.१३ दि.०९/जानेवारी २०२४ ला संस्थेच्या वतीने संत जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृहाचे जागेवर अतीशय उस्फुर्तपणे पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे माजी अध्यक्ष विश्राम भनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली.याप्रसंगी राजु  मदनकर, अध्यक्ष परमात्मा एक, मनोज जिभकाटे उपसरपंच भिलगाव, अतुल बावनकुळे उपसरपंच खसाळा, खोजेन्द्र माकडे भिलगाव, होमेश्वर चकोले, गोपाळराव वंजारी,लक्ष्मण नाटकर उपस्थित होते.यानंतर भजन कीर्तन मृदंगाच्या तालावर संपूर्ण परिसर भक्तिभावाने निनादला.किर्तन गोपालकाला आरतीने संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची पुजा अर्चना करण्यात आली.

यानंतर झालेल्या समाज स्नेह संमेलनाची सुरुवात पाहुण्यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून बाल भगिनींनी गोंधळ नृत्य सादर केले. प्रमुख पाहुणे आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प अध्यक्ष निशा सावरकर, जिप सदस्य मोहन माकडे, गंगाधर नाकाडे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक सेना, करुणा आष्टनकर अध्यक्षा न.पं.कन्हान, गुलाबराव सुपारे संस्था मार्गदर्शक, चित्रा माकडे, डॉ.दिनेश जिभकाटे, संताजी ब्रिगेड चे अजय धोपटे, माजी जि.प.उपाध्यक्ष शरद डोणेकर, डॉ.शिल्पा भुते स्त्रीरोगतज्ञ, मनीष कारेमोरे, माजी सरपंच, निखिल भुते, गजानन बावनकुळे, शोभा वंजारी, डॉ.चांगदेव जुनघरे, प्रा. ज्ञानेश्वर रेवतकर,नत्थुजी रघटाटे, मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम हटवार यांनी केले. संस्थेचे जागेवर रु.७६ लाख निधीचे मंजूर झालेले संताजी जगनाडे महाराज कौशल्य विकास केंद्राचे भुमीपुजन मा.आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी उपस्थित समाज बांधवाना मार्गदर्शन करताना सावरकर यांनी या कौशल्य केन्द्रातुन समाजातील उपेक्षित व गरजुंना स्वयंरोजगार व व्यवसायीक प्रशिक्षण देण्यात येइल.या भवनाचे बांधकाम भव्य व्हावे यासाठी निधी कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या केंद्रभुमी पुजनास कामाचे व्यस्थतेने उपस्थित न झाल्याने बांधकामास शुभेच्छा देत निधीची कमतरता होणार नाही लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल याची माहीती यावेळेस दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपाध्यक्षा मंगला कारेमोरे यांनी तर आभारप्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्षा सविता कुल्लरकर यांनी केले.

या पुण्यतिथीचे निमित्ताने आयुष्य मान भारत हेल्थकेअर कार्ड कॅम्प महालक्ष्मी ऑनलाइन सर्विसेस गायधने परीवाराचे सौजन्याने राबविण्यात आला.व कार्ड पाहुण्यांचे हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शंकरराव वाडीभस्मे हरीहर गायधने, सुरेश भनारे, भैय्यालाल माकडे, गोपाळराव वंजारी, प्रभाकर गायधने, रमेश कारेमोरे, ज्ञानेश्वर वंजारी, अरविंद पाहुणे, मुकुंद जिभकाटे, मुकेश चकोले, दिनेश आष्टनकर, संजीव बावनकुळे, प्रल्हाद वंजारी, अतुल गायधने, डॉ.अतुल भुते,रवी हटवार, डॉ.रमेश वाडिभस्मे,योगेश गायधने, देवेंद्र बावनकुळे, रमाकांत श्रावणकर राधेश्याम मानकर आनंद चकोले, सागरमदनकर, राजेश हटवार सावित्री तेलरांधे जया  वाडीभस्मे माधुरी वंजारी, गीता गायधने, भाग्यश्री पाहुणे, सुरेखा पाहुणे, वनीता नाटकर ममता भनारे, संगीता पोटभरे वर्षा बावनकुळे, उषा कारेमोरे, शिला देशमुख, सिंधु मोरे, कल्पना गायधने, वंदना भस्मे, कविता बावनकर यांनी कार्यक्रम करीता परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव व भगीनी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात मोदींचा झंझावात, नाशिकमध्ये मोदींचा रोड शो; आठ तासात देणार राज्याला 30 हजार कोटींची भेट

Fri Jan 12 , 2024
मुंबई :- महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण,पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 30 हजार 500 कोटींच्या विकासकामांची भेट महाराष्ट्राला देणार आहेत. ज्याचं स्वरूप सागरी सेतू ते रेल्वेचं जाळं असं आहे. ज्यातून महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि दळणवळणाला गती मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याची वेळ बदलली आहे. दुपारी 12.15 ऐवजी मोदी सकाळी 10.15 वाजता नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी साडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com