संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आयोजित पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) स्पर्धा

पहिल्या दिवशी विविध विद्यापीठांच्या संघांची विजयी सलामी

अमरावती :-   संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर दि. 31 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध विद्यापीठांच्या संघांनी जोरदार लढत देवून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या पाच राज्यातील 72 विद्यापीठांचे व्हॉलीबॉल महिला संघाचे खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात पूल ‘अ’ मध्ये कच्छ विद्यापीठ, गुजरात विरुद्ध महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बिकानेर यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये बिकानेर संघाने विजय मिळविला. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुद्ध गोविंद गुरु ट्रायबल विद्यापीठ, बंसवरा यांच्यात सामना झाला, त्यामध्ये अहमदाबाद संघाने विजय मिळविला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये कोल्हापूर विद्यापीठ संघाने विजय प्राप्त केला. कोटा विद्यापीठ, कोटा विरुद्ध बर्कतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ सामन्यामध्ये कोटा विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे भोपाळ विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. एम.डी. सरस्वती विद्यापीठ, अजमेर विरुद्ध मनिपाल विद्यापीठ, जयपूर सामन्यामध्ये जयपूर विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे अजमेर विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले.

पूल ‘ब’ मध्ये भक्त कवि नरसिंह मेहता विद्यापीठ, जुनागढ विरुद्ध भूपाल नौब्लेस विद्यापीठ, उदयपूर सामन्यामध्ये उदयपूर विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे जुनागढ विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. मुंबई विद्यापीठ, मुंबई विरुद्ध राजस्थान विद्यापीठ, जयपूर यांच्यात जोरदार लढत झालेल्या सामन्यात राजस्थान विद्यापीठ संघाने विजय मिळविला. वीर नर्मद साऊथ गुजरात विद्यापीठ, सुरत विरुद्ध द महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा यांच्यात रंगलेल्या सामन्यात सुरत विद्यापीठ संघाने विजय मिळविला. छिंदवाडा विद्यापीठ, छिंदवाडा विरुद्ध भारती विद्यापीठ, पुणे यांच्यात सामना झाला, त्यामध्ये पुणे विद्यापीठ संघाने विजय प्राप्त केला. भगवान महावीर विद्यापीठ, सुरत विरुद्ध श्री खुशालदास विद्यापीठ, हनुमानगढ सामन्यामध्ये सुरत विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे हनुमानगढ विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला.

पूल ‘क’ मध्ये राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यालय, भोपाळ विरुद्ध चारोतर विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, गुजरात सामन्यामध्ये गुजरात विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे भोपाळ विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती विरुद्ध डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सामन्यामध्ये अकोला विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे अमरावती विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. इंडियन इन्स्टिटट ऑफ टिचर एज्युकेशन, गांधीनगर विरुद्ध मारवाडी विद्यापीठ, राजकोट सामन्यामध्ये गांधीनगर संघ अनुपस्थित राहिल्यामुळे राजकोट विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला. एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई विरुद्ध राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर सामन्यामध्ये बिकानेर विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे मुंबई विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, अहमदाबाद विरुद्ध अपेक्स विद्यापीठ, जयपूर सामन्यामध्ये अहमदाबाद संघ विजयी घोषित करण्यात आला.

पूल ‘ड’ मध्ये मेवार विद्यापीठ, गंग्रार, चित्तोडगढ विरुद्ध महाराजा छत्रसाल बुंदेलखेड विद्यापीठ, छत्तरपूर सामन्यामध्ये चित्तोरगढ विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे छत्तरपूर विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला. केंद्रीय विद्यापीठ राजस्थान, अजमेर विरुद्ध गोकुल ग्लोबल विद्यापीठ, सिद्धपूर, गुजरात सामन्यामध्ये गुजरात विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे अजमेर विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. जिवाजी विद्यापीठ, ग्वालियर विरुद्ध जनार्दन राय नगर राजस्थान विद्या., उदयपूर सामन्यामध्ये उदयपूर संघ अनुपस्थित राहिल्यामुळे ग्वालियर विद्यापीठ संधाला विजयी घोषित करण्यात आले. जयनारायण व्यास विद्यापीठ, जोधपूर विरुद्ध महाराजा क्रिष्णकुमार सिंहजी भावनगर विद्यापीठ, भावनगर यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये जोधपूर विद्यापीठ संघाने विजय मिळविला.

स्पर्धेत रेफरी म्हणून पी.आर. सावंत, डॉ. अनिलकुमार शेळके, संजय बढे, रामानंद गोसावी, अमोल ठाकरे यांनी, तर सहाय्यक म्हणून जयश्री खडसे व मुग्धा यांनी काम पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांशीरामजी व मी एकाच कार्यालयात होतो, त्यांनी मला प्रभावित केले, त्यांच्या अस्थीने मी सुखावलो : भन्ते विमलकीर्ती

Tue Nov 1 , 2022
नागपूर :- बामसेफ, बी आर सी, डी एसफोर व बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी हे पूर्वी पुण्याच्या रक्षा विभागात (डिफेन्स) वैज्ञानिक पदावर कार्यरत असताना त्याच कार्यालयात भन्ते विमलकीर्ती हे कार्यरत होते. कांशीरामजींनी 1964 ला नोकरी सोडून स्वतःला सार्वजनिक कार्यात झोकून दिले. त्याच पद्धतीचे कार्य विमलकीर्ती यांनी पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्रेलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण (TBMS) ला झोकून दिले. त्यांनी भन्ते संरक्षित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com