मल्लखांबमध्ये संस्कृती, गिरीश, अथर्वला दुहेरी जेतेपद, खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत मल्लखांब स्पर्धेमध्ये संस्कृती गाडवे, गिरीश सोनकुसरे आणि अथर्व बडिये यांनी प्रत्येकी दुहेरी जेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली.

नूतन भारत अभ्यंकर नगर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 16 वर्षावरील वयोगटात रोप मल्लखांब आणि पोल मल्लखांब या प्रकारात संस्कृती गाडवे हिने प्रथम स्थान प्राप्त केले. रोप मल्लखांबमध्ये संस्कृतीने 8 गुण तर पोल मल्लखांबमध्ये 6.80 गुणांसह बाजी मारली.

16 वर्षावरील वयोगटात गिरीश सोनकुसरेने रोप मल्लखांबमध्ये 7 गुण आणि हँगिंग मल्लखांबमध्ये 5.06 गुणांसह पहिले स्थान पटकाविले. 18 वर्षाखालील वयोगटामध्ये हँगिंग आणि रोप मल्लखांब प्रकारात अथर्व बडिये ने 6.33 आणि 6.95 गुणांसह विजेतेपद पटकाविले.

16 वर्षावरील मुली (रोप मल्लखांब): संस्कृती गाडवे (8), समृद्धी बांगरे (7.8), आदिती चौधरी (6.60).

16 वर्षावरील मुली (पोल मल्लखांब): संस्कृती गाडवे (6.80), समृद्धी बांगरे (6.35), आदिती चौधरी (5.15).

18 वर्षावरील मुले (रोप मल्लखांब): गिरीश सोनकुसरे (7.00), दीपेंद्र विरखेडे (6.80), मेघराज हिवसे (6.60)

18 वर्षावरील मुले (पोल मल्लखांब): मेघराज हिवसे (7.10), गिरीश सोनकुसरे (6.80), चैतन्य हाडके (5.80)

18 वर्षावरील मुले (हँगिंग मल्लखांब): गिरीश सोनकुसरे (5.06), मेघराज हिवसे (5.16), दीपेंद्र विरखेडे (4.56)

18 वर्षाखालील मुले (हँगिंग मल्लखांब): अथर्व बडिये (6.33), वंश कुल्लाकर (5.20), प्रेम शाहू (4.56)

18 वर्षाखालील मुले (रोप मल्लखांब): अथर्व बडिये (6.95), प्रियांशू कठाणे (6.75), तेजस सेलोकर (6.70)

18 वर्षाखालील मुले (पोल मल्लखांब): प्रेम शाहू (7.40), अथर्व बडिये (7), हिमांशू भारद्वाज (4.56)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी

Thu Jan 18 , 2024
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते ४.३० या वेळेत कविवर्य श्री सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे होणार आहे. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून केंद्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com