सन्मान रामटेकचा : डॉ.रामचंद्र जनार्दन जोशी यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती

रामटेक – प्रभु श्री. रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या अशा रामटेक स्थित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलसचिव पदावर रामटेक निवासी डॉ.रामचंद्र जोशी यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती झाली.  रामटेक वासियांकरिता हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि उत्साह वाढविणारा आहे.  मा.कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी यांनी विश्वविद्यालयाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून म्हणजे मागील चार वर्षापासून विद्यापीठाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला आहे.  सुरूवातीला असलेले 36 संलग्नीत महाविद्यालये 200 चा आकडा पार करत आहे, तर विद्यार्थी संख्या 3500 वरून 30000 पर्यंत पोहचलेली आढळते.  अशा या विद्यापीठाने दूरदृष्टी ठेवून विश्वविद्यालयाच्या सर्वोच्च प्रशासकीय पद म्हणजे कुलसचिव पदावर डॉ.रामचंद्र जोशी यांची केलेली नियुक्ती ही अत्यंत दूरगामी विश्वविद्यालयाच्या विकासाकरिता आणि रामटेक वासीयांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
डॉ.रामचंद्र जोशी यांच्या विषयी सांगायचे म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.  ते अत्यंत उच्च विद्याविभूषित असून वाणिज्य शास्त्रात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.  त्यांनी नांदेड आणि औरंगाबाद विद्यापीठातून विविध प्रशासकीय पदांवर कार्य केले आहे.  सन 2009 पासून उपवित्त व लेखा अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी या पदांवर कार्य करून विद्यापीठाच्या आस्थापनेवर आणि रामटेक वासीयांच्या जनमानसात त्यांनी आपला ठस्सा उमटविला आहे.  रामटेकच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.  त्यांना संस्कृत सोबतच विज्ञान, तंत्रज्ञान आणि संगणकाचे ज्ञान अवगत असून त्याचा वापर ते जनहीतार्थ नेहमी करतात.  संस्कृत विद्यापीठात त्यांनी मा.कुलगुरूंच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात मोठ्याप्रमाणात संगणकीकरण केले आहे.
ते उत्कृष्ट प्रशासक तर आहेतच परंतु ते एक कवी, एक मित्र, एक उत्कृष्ट पालक म्हणून सुद्धा त्यांचा गौरव होत असतो.  डॉ.रामचंद्र जोशी यांना रामटेक विषयी विशेष आस्था आहे.  त्यांना परिसरातील लहान मोठे सर्वच ओळखत असून सर्वांमध्ये त्यांच्या विषयी एक आदराची भावना असल्याचे विशेषत्वाने जाणवले आणि समाजातल्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.  याचे सर्व श्रेय ते प्रा.श्रीनिवास वरखेडी आणि रामटेक वासीयांना देतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अ‍ॅड. दिलीप एडतकर यांची काँग्रेसच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती

Fri Dec 17 , 2021
अमरावती  : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या 8 नव्या प्रवक्त्यांची नियुक्‍ती करुन त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दैनिक विदर्भ मतदारचे संपादक व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड. दिलीप एडतकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे,भावना जैन, निजामुद्दीन राईन,गोपाळ तिवारी, डॉ. सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील आणि भरत सुरेश सिंह यांचीही प्रवक्तेपदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!