नागपूर :- विधान परिषद पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बुधवारी (ता.१९) पहिल्यांदाच नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांचे नागपूर शहरात आगमन झाले. शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
बुधवारी सकाळी संदीप जोशी यांच्या निवासस्थानी हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी जेसीबी मधून जोशी यांच्यावर पुष्पवर्षाव करीत शुभेच्छा दिल्या. आदिवासी नृत्य, ढोलताशा पथक आणि फटाक्यांची आतिषबाजी करुन भारतीय जनता पार्टीद्वारे आनंद साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून संदीप जोशी यांची निवड केली. या निवडीनंतर जोशी यांनी सोमवारी १७ मार्च रोजी विधानसभेत नामांकन अर्ज दाखल केला व त्यांची बिनविरोध निवड देखील झाली.
बुधवारी (ता.१९) भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, जयप्रकाश गुप्ता, रामभाऊ आंबुलकर, विष्णू चांगदे, गुड्डू त्रिवेदी, नागपूर शहर महामंत्री अश्विनी जिचकार, शहर महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील,रितेश गावंडे, विनोद कन्हेरे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष बादल राऊत तसेच सर्व युवा मोर्चा चे सर्व मंडल अध्यक्ष उपास्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संदीप जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.