– नागपूर शहर (महानगर ) पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित
नागपूर :- मराठी पत्रकार परिषद मुंबई व नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नागपूर शहर (महानगर) पत्रकार संघाच्या वतीने रविवार दि. 19 नोव्हेंबर 2023 ला द्विवार्षिक निवडणूक निमित्त सभेचे आयोजन व्हि.एम. प्रिन्टर्स अॅन्ड बाईन्डर्स (संजय देशमुख) महाल, नागपूर येथे करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे यांनी निवडणूकीची धुरा सांभाळली. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणदास असरानी, महिला राज्य संघटक शोभा जयपूरकर, नागपूर शहर (महानगर) अध्यक्ष संजय देशमुख तर नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष राऊत उपस्थित होते. तसेच कामठी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदूजी कोल्हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मंचावरील पाहुणे मंडळींचे व आलेले सर्व पत्रकार बांधव व भगिनींचे स्वागत सत्कार करण्यात आले. बहुप्रतिक्षित असलेल्या या निवडणूकीच्या निमित्ताने आणि रविवारी वर्ल्ड कप फायनल क्रिकेटचा सामना रंगतदार असून सुद्धा या निवडणूक सभेला व दिवाळी मिलनाच्या निमित्ताने का होईना पत्रकार बंधु आणि भगिनींनी एकजुटीचा परिचय दाखवित खचाखच भरलेल्या हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि कुठल्याही प्रकारच्या निवडणूकीला सामोरे न जाता सर्वानुमते ही अविरोध निवडणूक पार पडली.
याप्रसंगी नागपूर शहर (महानगर) पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दैनिक भास्करचे समीर खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्याध्यक्ष पदी एन. टीव्ही. न्यूज (चॅनेल) व सा. उपराजधानीचे पत्रकार अनिल के. बालपांडे तर सचिवपदी दै. स्वर्णभूमीचे संपादक वैभव जोगी यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी मराठा तेज (चैनल) च्या पत्रकार कविता पवार आणि कोषाध्यक्ष पदी सा. संत्रानगरी टाईम्सच्या संपादिका शैला पौनीकर या सर्वांची अविरोध निवड झाली. या सभेत अध्यक्षांच्या परवानगीने संपूर्ण शहर कार्यकारिणी गठित करून तसा अहवाल जिल्ह्याला सात दिवसात पाठवावा, असे निर्देश सभेचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार यांनी शहर संघाला याप्रसंगी दिले. या निवडणूक कार्यक्रम प्रसंगी सचिव अशोक चापके, कोषाध्यक्ष कविता पवार, सहसचिव राजेश पिसे, ज्येष्ठ पत्रकार सुनील तिजारे, संजय मुंदलकर, दिनेश श्रीवास्तव, उमाकांत वाघ, सोमदत्त खडसे, पंकज पांडे, धर्मपाल जगदीश, विजय देशमुख, शेखर लसुन्ते, सुनील चिरकुटे, संजय त्रिवेदी, धर्मेंद्र येंचिलवार, गणेश हांडे, अमर पारधी, मृणाल पौनीकर तसेच महिला पत्रकारांमध्ये शितल भगत, मोनाली लसुन्ते, शितल देशमुख व इतर सहयोगी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी मावळते अध्यक्ष संजय देशमुख यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले व नविन अध्यक्षांच्या हाती शहराचा कारभार सुपूर्द केला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संगीता पिसे यांनी मानले.