अशोक कोल्हटकर यांना ‘समता योद्धा सन्मान पुरस्कार’

– समता सैनिक दलतर्फे सन्मानपात्र देऊन सत्कार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष, समता जेशिसचे सचिव, इंदोरा बुद्ध विहार समितीचे माजी विश्वस्त, नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव, सम्राट अशोक शिक्षण संस्थेचे सचिव, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे जिल्हा सल्लागार, बेझनबाग कामगार गृहनिर्माण संस्थेचे संचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑप. बँकेचे ज्येष्ठ पालक संचालक अशोक कोल्हटकर यांना समता सैनिक दलतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘समता योद्धा सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी दीक्षाभूमी येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अशोक कोल्हटकर यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे.एन.यू. दिल्ली विद्यापीठाचे प्रा.डॉ. लक्ष्मण यादव, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता संविधान तज्ज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांची उपस्थितीत होती. या मान्यवरांच्या हस्ते अशोक कोल्हटकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, ॲड. स्मिता कांबळे, जिल्हा बार असोसिशनचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे, कवी हृदय चक्रधर, प्रितम बळकुंडे व समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६७ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Sat Apr 22 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (ता. २१) रोजी शोध पथकाने ६७ प्रकरणांची नोंद करून ४८ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!