– समाज भूषण पुरस्कार ॲड. नंदा पराते यांना जाहीर व आज जाहीर सत्कार
नागपूर :- आदिम युथ फाऊंडेशनच्या माध्यमाने रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जैन भवन गांधीबाग येथे गणमान्य व्यक्तींना समाज भूषण व अन्य पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी संघर्ष समितीचे संयोजक विश्वनाथ आसई ,प्रमुख पाहुणे म्हणून माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते राहतील. पुरस्कार वितरण कार्यक्रमात धनंजय धापोडकर ,प्रकाश निमजे,अनिता पराते, प्रा.देवराम नंदनवार, कीर्तिकुमार पराते, रामा नंदनकर उपस्थित राहतील.
आदिम युथ फाऊंडेशने यावर्षीचे समाज भूषण पुरस्कार सामाजिक,सांस्कृतिक ,धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अग्रगण्य महिला व आदिम नेत्या म्हणून ॲड. नंदा पराते यांना तर त्यासोबतच राजू नंदनवार यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आहे. समाज गौरव पुरस्कार चुडामण बल्हारपुरे ,सागर कुंभारे,रमेश बाजीराव यांना तर समाज रत्न पुरस्कार गोपाल हेडाऊ,राजेश धकाते ,डॉ. राजेश टिक्कस ,रमेश संत यांना जाहीर झाले. सर्वउत्कृष्ठ संस्था म्हणून आदिवासी हलबा समाज विकास संस्था तर हलबा योद्धे शिवानंद साहारकर,प्रीती शिंदेकर ,छाया खापेकर,प्रा. यशश्री नंदनवार आणि विशेष सत्कार योगेश खडगी, यश शिंदेकर यांचे करण्यात येईल.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जैन भवन गांधीबाग येथे मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिम युथ फाऊंडेशचे अध्यक्ष भाऊराव पारखेडकर सचिव ओमप्रकाश पाठराबे,विनायक वाघ, किशीर पाटणकर,वासुदेव वाकोडीकर, सुरेश हेडाऊ, प्रकाश दुलेवाले, मेघनाथ सोरटे, शंकर बुरडे, ऍड राकेश पाठराबे, हरेश निमजे,सुभाष चिमुरकर, रमेश निनावे,प्रेमनाथ रामटेकर ,प्रमिला पराते,रामकृष्ण धार्मिक, रमेश वडिखाये ,हरी चिचघरे यांनी केले आहे.