नागपूर :- सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात आज सोमवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोलाचे योगदान देणारे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५ – १५ डिसेंबर १९५०) यांना जयंतीनिमित्त तसेच कणखर व्यक्तिमत्व आणि धाडसी नेतृत्वामुळे ‘आर्यन लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ – ३१ ऑक्टोबर १९८४) यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. नामप्रविप्रामध्ये अपर आयुक्त अविनाश कातडे यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ‘नामप्राविप्र’चे नगर रचना विभागाचे सह संचालक आर. डी. लांडे, कार्यकारी अभियंता तथा कार्यकारी अधिकारी अनिल पातोडे, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, आस्थापना अधिकारी विजय पाटील आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे तसेच नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नासुप्र येथे सरदार पटेल यांना अभिवादन तर इंदिरा गांधी यांना आदरांजली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com