संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी तर्फे त्यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे एक मराठी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते.आजही मोठ्या संखेने विद्यार्थी व संशोधक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करतात. संयुक्त महाराष्ट्रची चळवळ कलापथक व शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी लोकमानसात रुजविली. अनेक पोवाड़े, कथा संग्रह, शाहिरी, नाटके, वगनाट्य, लोकनाट्य, आणि प्रवास वर्णन ही त्यांची संपत्ती आहे. अशी माहिती भाजप शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी यावेळी बोलतांना दिली
अत्त दिप भव बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात प्रास्तविक शंकर चवरे यांनी तर आभार प्रज्वल सौलंकी यांनी मानले, यावेळी भाजप अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले,तसेच सूर्यकांता चवरे,पंचशीला डोंगरे, चित्रा रंगारी, संगीता बोरकर, रुखमा डोंगरे, मैना रंगारी, कविता चव्हान, संगीता बिसी,अनिता चौटेल,हेमंत सोनी,संतोष धुरिया, अंकित बंसोड,रोहित मेश्राम,पवनसिंग ठाकुर, धर्मपाल सुखदेवे, निमिष सांगोड़े,नरेश बर्वे, मनोज तेलंग प्रामुख्याने उपस्थित होते.