गोंदिया :- गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित स्थानिक नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विभागातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला डॉ. बबन मेश्राम, डॉ. सुयोग इंगळे, डॉ. मस्तान शहा, डॉ.सुनील जाधव, लीकेश दहीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. भारत हा देश खेड्यात वसलेला देश आहे. खेड्याच्या विकासातच देशाच्या विकासाची बीजे दडलेली आहेत, हे जाणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खेड्याच्या विकासाला दिशा देणारा ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. चांगल्या कामाला प्रेरणा तर अनिष्ट चालीरीतीवर प्रहार करण्याचे काम राष्ट्रसंतांनी केले. आपल्या नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे, हे आपले भाग्य. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन देशाचा विकास घडवून आणण्यासाठी खेड्याच्या विकासात योगदान देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. यावेळी डॉ. बबन मेश्राम,डॉ.सुयोग इंगळे, डॉ. सुनील जाधव यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी डाॅ. रवींद्र मोहतुरे, डॉ. भावेश जसानी, डॉ.अंबादास बाकरे, प्रा. घनशाम गेडेकर, प्रा. रितेश चौरीवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. लोकेश कटरे तर आभार प्रा. अर्चना अंबुले यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.