संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- भारतीय जनता पार्टी कन्हान शहर तर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय जनता पार्टी कार्यालय कन्हान येथे साजरी करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहर अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक ,प्रमुख अतिथी ओबीसी जिला ग्रा. महामंत्री राम दिवटे, व महाराष्ट्र प्रदेश सदस्य संदीप कश्यप यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प अर्पित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. मनोहर पाठक यांनी बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्वी केलेल्या कार्याची विस्तृत माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली तसेच रामभाऊ दिवटे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शहर महामंत्री सुनील लाडेकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन महेंद्र साबरे यांनी केले. .
याप्रसंगी जिल्हा महिला उपाध्यक्ष स्वाती पाठक,शहर महिला आघाडी अध्यक्ष तुलेषा नानवटकर,तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी, अनु. जा. मोर्चा महामंत्री रिंकेश चवरे ,मनोज कुरटकर,तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके, शहर ओबीसी अध्यक्ष अमोल साकोरे, श्रवण वतेकर, महेंद्र चव्हाण ,मयूर माटे ,सुरेश कळंबे, सचिन वासनिक ,राहुल वानखेडे, चंद्रगुप्त पानतावणे, तुषार उमाळे, धनराज ढोके, सुनंदा दिवटे ,रंजना कश्यप आणि मोठ्या संख्येत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.