संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथीनिमित्त आज टिळक पत्रकार भवनातील अर्धपुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष विश्वास इंदूरकर, ट्रस्टचे व्यवस्थापकद्वय विनोद देशमुख, प्रभाकर दुपारे, नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वर्षा बासू, वर्षा तुपकर-मदने, मेट्रोचे सुनील तिवारी आदी उपस्थित होते.