नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोन कार्यालयामध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, मुख्य स्वच्छता अधिकारी सुनिल तांबे, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, खुशिराम रामटेक्कर, रोशन जांभुळकर, सतिश खरे, अंतकला मेश्राम, सुनंदा बोदिले, शशी फुलझेले, श्रीकांत गेडाम,करिश्मा गजभिये आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून वंदन केले. कार्यक्रमामध्ये दीक्षाभूमी ते कोरेगाव भिमा धम्मज्योती मशाल घेऊन गेलेले मयुर मेश्राम, रॉकी मेश्राम, प्रणय गडपायले, प्रिंस कावळे, आर्यन बोरकर आदींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देउन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अथांग कराडे यांनी केले. संचालक अंतकला मेश्राम यांनी केले व आभार सुनंदा बोदिले यांनी मानले.