नागपूर :- सखी मंडळ, टेलिकॉम नगर महिला सदस्य तर्फे हनुमान मंदिर, टेलीकॉमनगर येथे लहान मुलासाठी नुकतेच १० दिवसांचे ‘बाल संस्कार शिबीर ‘ आयोजित करण्यात आले होते.५ ते १० वर्ष वयोगटातील जवळपास २५-३० लहान मुला -मुलींनी ह्या संस्कार शिबिरात भाग घेतला . बाल संस्कार शिबिरात लहान मुलांना श्लोक, प्रार्थना , सूर्यनमस्कार, पथनाट्य, नृत्य,लोककला चित्रकला , लोककथा, क्राफ्ट तसेच दिंडी इत्यादी शिकविण्यात आले.
बाल संस्कार शिबिराची सांगता प्रार्थना,श्लोक, आणि ओंकार ह्यांनी सुरुवात झाली तसेच विठ्ठल नामाच्या गजरात बाल पालखी काढण्यात आली . पालखी मध्ये सर्व मंडळी विविध वेशभूषा पेहराव करून सामील झाली होती. त्यानंतर पाणी ह्या ज्वलंत विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
सखी मंडळ सदस्य आणि टेलिकॉम नगर हनुमान मंदिर सदस्य ह्यांच्या परिश्रमामुळे १०-दिवसीय बाल संस्कार शिबीर यशस्वी झाले.