एस ए रहीम U-15 आंतरशालेय क्रिकेट टुर्नामेंटमध्ये साईश भिसेच्या ११९ धावा.

नागपूर :विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित एसए रहीम १५ वर्ष वयोगटातील स्थानिक स्पर्धेत कुर्वेज न्यू.मॉडेल पब्लिक स्कूल, श्रद्धानंद पेठ विरुद्ध सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट , फेट्री दरम्यान एस.एस.सी. ऐ. मैदानावर सामना रंगला होता. कुर्वेज न्यू.मॉडेल पब्लिक स्कूल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट संघासमोर जिंकण्यासाठी ५० षटकामध्ये ३२९ धावांचा डोंगर उभा केला होता . साईश भिसे यांनी संयमी फटकेबाजी करताना ११९ (९९) धावा काढल्या. त्याच्या फटकेबाजीत १७ चौकाराचा समावेश होता. शिवम लोणारे यांनी -६९ (५३) धावा, आरुष उस्केलवार – ३१ ( ३०) धावा काढल्या. आदित्य मोरे , आयुष यादव, दर्ष गिरगावकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट यांनी धावांचा पाठलाग करतांना ३६.१ षटकामध्ये सर्वबाद १५५ धावा केल्या. सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट कडून खेळताना निहाल मोर्य यांनी सर्वाधिक ५८ (७५) धावा काढल्या. सरतेशेवटी कुर्वेज न्यू.मॉडेल पब्लिक स्कूल १७५ धावांनी विजयी झाला. विजयाबद्दल चारुशीला  यांनी अभिनंदन केले. स्कोरर म्हणून ऋषी लोधे आणि यातीन वाघ आणि अंकिता गुहा यांनी पंचाची भूमिका पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

VIA Agro & Rural Development Forum organised seminar on Samruddhi Mahamarg se Samruddh Kisan

Mon Jan 9 , 2023
Nagpur:-As envisaged by the planning authorities, Vidarbha farmers are going to get immense benefits from Samruddhi Mahamarg, said Dr Mahendra Darokar, Chief Scientist & Coordinator of both Mission Aroma & Mission Floriculture, CSIR – Govt of India, virtually on line, during the seminar on “Samruddhi Mahamarg se Samruddh Kisan”, organized by the Vidarbha Industries Association (VIA) Agro & Rural Development […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com