हेमा संतोष आठवले यांचे दु:खद निधन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

मुंबई :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले याचे चुलत बंधु संतोष यांच्या पत्नी हेमा संतोष आठवले यांचे वयाच्या 40व्या वर्षी मुलुंड येथे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हेमा संतोष आठवले यांच्या दु:ख निधनाने आठवले परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलुंड मध्ये रिपब्लिकन चळवळीत तिव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. हेमा आठवले यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आणि नवरा संतोष आठवले असा त्यांचा परिवार आहे.

दिवगंत हेमा आठवले यांच्या वर आज दि.27 फेब्रुवारी रोजी मुलुंड येथील स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलुंड निलम नगर येथील त्यांच्या राहत्या घरा पासून मुलुंड डंपिंग रोड येथील स्मशान भुमि पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे सहकुटुंब दिवगंत हेमा आठवले यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. अंत्यसंस्कारात उपस्थित राहुन दिवगंत हेमा आठवले यांना शेवटची भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण केली. यावेळी सिमा आठवले, शंकुतला आठवले जित आठवले,शरद आठवले संपूर्ण आठवले परिवार रिपांइ चे दादासाहेब झेंडे,योगेश शिगवण, बाळासाहेब गरुड,श्रीकांत भालेराव,अजित रणदिवे आदि मुलुंड मधिल आंबेडकरी चळवळीचे नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भ स्तरीय कॅरम स्पर्धेत इरशाद अहमदला विजेतेपद तर गुरुचरण तांबेला उपविजेतेपद

Tue Feb 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- माजी आमदार स्वर्गीय यादवराव भोयर क्रीडा महोत्सवा अंतर्गत इमलीबाग सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत इरशाद अहमद ला विजेते पद तर गुरुचरण तांबे याला उपजेतेपद कामठी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मोहम्मद शहाजाहा शफाहत अंसारी यांचे हस्ते विजेता इरशाद अहमद व उपजेता गुरुचरण तांबे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले . यावेळी स्पर्धेचे संयोजक मोहम्मद इरशाद शेख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com