संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामीण भागातील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्वकांक्षी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान यांनी भारतीय जनता पार्टीचे वतीने राम मंदिर सभागृहात आयोजित नारीशक्ती वंदन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले नारी शक्ती वंदन कार्यक्रमाची सुरुवात नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान यांचे हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके ,शहराध्यक्ष चंद्रशेखर तुपट ,राजेश खंडेलवाल, भाजप नागपूर जिल्हा उपाध्यक्ष लतेश्वरी काळे, कामठी शहर भाजप महिला आघाडी अध्यक्ष कुंदा रोकडे, कपिल गायधने, सचिन डांगे ,संगीता अग्रवाल ,प्रीती कुलरकर, रोशनी कानफाडे, स्वाती साबळे, अंकिता तळेकर ,मंदा महल्ले, सरिता भोयर, ब्रह्मानंद काळे उपस्थित होते कार्यक्रमात मुख्य अतिथीनि केंद्रातील मोदी सरकार व राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली सोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक लतेसरी काळे यांनी केले संचालन संगीता अग्रवाल यांनी केले व आभार प्रदर्शन प्रीती कुलरकर यांनी मांनले कार्यक्रमाला माजी नगरसेवक कल्पना खंडेलवाल ,पिंकी ,वैद्य संध्या रायबोले , कपिल गायधने ,लालसिंग यादव ,विजय कोदुलवार, उज्वल राइबोले ,पंकज वर्मा ,आरती रावेकर , ज्योति रावेकर, एकता रावेकर ,इंदू पाटील ,सविता नंदेश्वर , स्मिता भोयर , मंगला ठाकरे ,अर्चना ठाकरे ,सविता कुलरकर सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.